विशाल फार्मसीचे ७ दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

1 min read

राजुरी दि.१६:-विशाल फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप दि.१६ जानेवारी रोजी उत्साहात झाला. हे ७ दिवसीय शिबिर विद्या विकास मंदिर, राजुरी येथे भरवण्यात आले होते.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिपक औटी संचालक कृ. उ. बाजार समिती जुन्नर हे उदघाटक म्हणून लाभले. तर अंकुश सोनवणे अध्यक्ष विशाल जुन्नर सेवा मंडळ, मुंबई यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले, उदघाटन प्रसंगी प्रिया हाडवळे सरपंच,राजुरी, माऊली शेळके उपसरपंच, राजुरी, एम.डी घंगाळे अध्यक्ष शरदचंद्र पतसंस्था, राजुरी, बबन हाडवळे उपाध्यक्ष जनता विकास मंडळ, राजुरी, पंकज कणसे सामाजिक कार्यकर्ते तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त सदस्य विक्रांत काळे, सचिन हाडवळे, प्रदिप डुंबरे, निमंत्रित सदस्य संतोष पारखे, सभासद दत्ता कोरडे आदी तर गटकळ गुरुजी, ज्ञानेश्वर गटकळ, प्रसंगी विद्या विकास मंदिराचे प्राध्यापक जी. के. औटी, पवार सर या मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सीईओ डॉ. दुश्यंत गायकवाड, प्राचार्य डॉ. सुरेश जाधव हजर होते.या शिबिरात योगा अभ्यास, ग्राम स्वच्छता, आरोग्य शिबीर, वन संवर्धन, आरोग्य जनजागृती, प्रार्थना स्थळ स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, पथनाट्यातून जनजागृती यांसारख्या उपक्रमांवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम व आरोग्य शिबिर राबवून त्यात रक्तगट, हिमोग्लोबिन, बीएमआय यासारख्या तपासण्या करून जनतेमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली. तसेच ग्रामविकासासाठी वृक्षारोपण, घेरू व चुन्याने खोड रंगवणे व अन्य सुधारणा उपक्रम राबविण्यात आले.शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी श्रमसंस्काराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमांमुळे त्यांना समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.या कालावधीत शरद सोनवणे (आमदार, जुन्नर विधानसभा), मा. प्रा. रामदास गाडेकर(विभागीय समन्वयक. रा. से. यो. सा. फु.पुणे विद्यापीठ,पुणे), मा.कोरडे सर (मा.अध्यक्ष विशाल जुन्नर सेवा मंडळ) यांनी सदिच्छा भेट दिली. प्रदीप डुंबरे, जी. के. औटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गवारे सर व राहिंज सर यांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले. विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच रासेयोचे विद्यार्थी प्रतिनिधी तेजस लबडे, नंदिता रामटेके, ओम खैरे, अनुष्का कुंभार यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.तर समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत काने (सहसचिव, विशाल जुन्नर सेवा मंडळ), अंकुश सोनवणे अध्यक्ष विशाल जुन्नर सेवा मंडळ तर अजय कणसे (सरपंच, उंचखडक), एकनाथ शिंदे (मा. सरपंच, राजुरी), बाळासाहेब हाडवळे (अध्यक्ष, गणेश सहकारी दुध संस्था, राजुरी), चंद्रकांत जाधव (मा. उपसरपंच, राजुरी) जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त सदस्य विक्रांत काळे, प्रदिप डुंबरे यांची विशेष उपस्थिती लाभली.समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्यांच्या श्रमसंस्कार उपक्रमामुळे झालेल्या सकारात्मक बदलांवर भर दिला. “विद्यार्थ्यांनी या शिबिरात दिलेले योगदान समाजाला नवा संदेश देणारे ठरले आहे,” असे उद्गार प्रमुख पाहुण्यांनी काढले.या शिबिराने विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास साधण्यास मदत केली असून. ग्रामीण भागातील जनतेनेही शिबिरातील उपक्रमांना प्रोत्साहन दिले.सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, सीईओ डॉ. दुश्यंत गायकवाड व प्राचार्य डॉ. सुरेश जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे