अपघातात कांदळी गावातील ६ जणांचा मृत्यू; कांदळी गावावर शोककळा

1 min read

कांदळी दि.१७:- पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार दि.१७ रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ९ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये जुन्नर तालुक्यातील कांदळी गावातील मृतांमध्ये ६ जणांचा समावेश आहे. तर गावातील दोन जण जखमी झाले आहेत.

अचानक घडलेल्या या घटनेने कांदळी गावावर शोककळा पसरली आहे. अपघातातील मृत झालेले चार जण कायमस्वरूपी तर दोन तात्पुरे राहत होते. तर जखमी दोन अशा आठ जणांचा समावेश आहे.  यामध्ये भाऊ रभाजी बढे यांचा अंत्यविधी नगदवाडी स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात पार पडला तर चंद्रकांत गुंजाळ व विनोद रोकडे यांचा अंत्यविधी कांदळी स्मशानभूमीत पार पडला. या वेळी उपस्थितांनी प्रचंड आक्रोश केला होता.

कांदळीत तात्पूते राहणारे देऊबाई टाकळकर यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी वैशाखखेडे येथे झाला. गीता गवारे यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी बीड या ठिकाणी झाला. जिल्हा परिषद शिक्षिका मनीषा पाचरणे या १४ नंबर येथील शिक्षक सोसायटीत राहत होत्या.

त्यांचा अंत्यविधी त्यांचे मूळ गाव पळवे (ता.पारनेर) येथे शोकाकुल वातावरणात पार पडला अचानक झालेल्या या भयानक अपघाताने कुटुंबीयांना व नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

नगदवाडी व वैशाखखेडे येथे अंत्यविधी वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे गणपतराव फुलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, संगीता वाघ, रघुनाथ लेंडे, सुरज वाजगे, श्याम माळी, कांदळी गावचे माजी सरपंच बाळासाहेब बढे, विक्रम भोर, गुलाब घाडगे,

खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अशोक बढे यांच्यासह मोठ्या स्वरूपात जनसमुदाय उपस्थित होता. या अपघातामुळे गावावरती दुःखाचा डोंगर कोसळा असून गाव वरती शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे