पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात मृत जखमींचा नावे आली समोर

1 min read

नारायणगाव दि.१७:- पुणे-नाशिक हायवेवर मुक्ताई धाब्याजवळ आळेफाटाकडून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची पुढे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एसटी बसवर आदळून भीषण अपघात होऊन यात ९ जण ठार झाले असल्याची माहिती तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली. तर इतर ६ जणांवर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची ही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.अपघातात एकूण सात जण जागेवर ठार झाले, तर दोघेजण उपचारादरम्यान ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. मृतामध्ये एक दोन वर्षाचे बालक देखील असल्याचे समजते.अपघातात मृत्युमुखी पडलेले ८ प्रवाशांची ओळख पटली १) देबुबाई दामू टाकळकर (वय 65, रा. वैशखखेडे ता. जुन्नर जि. पुणे), २) विनोद केरूभाऊ रोकडे (50, वाहन चालक राहणार कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे), ३)युवराज महादेव वाव्हळ (वय 23, रा. 14 नंबर-कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे), ४) चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय 57, राहणार कांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे), ५) गीता बाबुराव गवारे (वय 45, 14 नंबर कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे), ६) भाऊ रभाजी बढे (वय 65, रा. नगदवाडी- कांदळी, ता. जुन्नर), ७) नजमा अहमद हनीफ शेख (वय- 35), वशिफा वशिम इनामदार (वय 5, रा. राजगुरुनगर, ता. खेड), ८) मनीषा नानासाहेब पाचरणे (वय 56 वर्षे राहणार 14 नंबर, ता. जुन्नर)

अपघातातील जखमी

१) ऋतुजा पवार (वय 21), गणपत बजाबा घाडगे (वय 52), २) शुभम संतोष घाडगे (वय 24, तिघेही राहणार कांदळी, ता. जुन्नर), ३) नाजमीन अहमद हनीफ शेख (राहणार राजगुरूनगर, ता. खेड), ४) मरजीना म्हम्मद हमीद शेख (वय 15, ता. राजगुरूनगर, ता. खेड), ५) आयशा समीर शेख (वय 14 राजगुरूनगर, ता. खेड) अशी आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे