पुष्पक एक्स्प्रेस रेल्वे अपघातात ११ जानांचा मृत्यू

1 min read

जळगाव दि.२२:- जळगाव जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा भीषण अपघात झाला आहे. पुष्पक ट्रेनला आग लागल्याची अफवा उठली, या अफवेमुळे ट्रेन थांबली असताना देखील 30 ते 35 प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उडी मारली.

मात्र समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने या प्रवाशांना चिरडलं. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण जखमी आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकाड वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान हा अपघात प्रवाशांमध्ये निर्माण झालेल्या आगीच्या भीतीमुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र अपघाताचं तांत्रिक कारण देखील आता समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे