पाबळमध्ये महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण
1 min read
शिक्रापूर दि.१६:- कारमधून जाणाऱ्या दाम्पत्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. ही घटना पाबळ (ता. शिरुर) येथील कन्हेरसर रस्त्यावर घडली. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी शुभम पोपट पिंगळे, अजित शिनलकर व एक अनोळखी युवक (सर्व रा. माळतळे पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, महिला तिच्या पतीसह कारमधून जात असताना समोरून एका दुचाकीहून शुभम पिंगळे, अजित शिनलकर हे त्यांच्या एका मित्रासह ट्रिपल शीट आले. दरम्यान महिलेची कार रस्त्यामध्ये आल्याने समोरून आलेल्या तिघांनी महिलेच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान महिला पतीला सोडवण्यासाठी गेली असता तिघांनी महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत महिलेचा विनयभंग करत महिलेला देखील मारहाण केली. यावेळी महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे मंगळसूत्र गहाळ झाले.