नारायणगाव पोलिसांची अवैध कॅफे चालक, लॉज, रोडरोमियो, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

1 min read

नारायणगाव दि.१६:-नारायणगाव पोलिसांनी अवैध कॅफेचालक, लॉज धारक यांच्यावर मंगळवारी (दि. १४) कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. तर शालेय परिसरातील रोड रोमिओ, बेशिस्त २२५ वाहन चालकांकडून ३ लाख १७ हजारांचा दंड वसूल केला आहे.नारायणगाव पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाचे काम पाहणारे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळुराम साबळे, पोलीस हवालदार दत्ता तळपाडे, पोलीस हवालदार आदिनाथ लोखंडे, पोलीस अंमलदार दत्ता ढेंबरे, काळूराम मासाळकर, सत्यम केळकर, गोरक्ष हासे, आनंद चौगुले, टिल्लेश जाधव, महिला पोलीस अंमलदार सोनाली गडगे, शीतल गारगोटे, शुभांगी दरवडे, पूजा शहा यांनी विशेष मोहीम राबवून कारवाई केली आहे. वारूळवाडी येथील म्युझिक कॅफे व नारायणगावचे कॅफे कॅपिटल या दोन अवैध कॅफे चालकांवर नारायणगाव पोलीसांनी कारवाई केली आहे.कॅफेमध्ये शालेय मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळल्याने कारवाई केली आहे. धनगरवाडी येथील नक्षत्र लॉज मालकाने ग्राहकांचे आवक जावक रजिस्टर अद्यावत न ठेवल्याने नारायणगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे