रांजणगावात डीझेल चोरी करणारे दोघे अटकेत
1 min read
रांजणगाव गणपती दि.१६:- येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांमधून चोरी करणाऱ्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहन अनिल अभंग (वय २७), निखिल पांडुरंग रोकडे (वय २१) (दोन्ही रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार वैभव सुरवडे (रा. जामखेड), -समाधान राठोड (रा. कोपरगाव), सचिन दाणे (रा. येवला, जि. नाशिक) हे फरार झाले आहेत. आरोपीकडून शिरुर हद्दीसह एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक आरोपीकडून एकूण ९५ हजार रुपये किंमतीचे ८०० लिटर डीझेल व एक बॅटरी असा मुद्देमाल जप्त केला आहे.पुढील तपास सहायक फौजदार गुलाब येळे, पोलीस हवालदार तेजस रासकर हे करीत आहेत.