महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने शिवांजली विद्यार्थी वस्तीगृह येथे गरीब विद्यार्थ्यांना तिळगुळ व शालेय साहित्य वाटप
1 min read
पिंपळवंडी दि.१४:- महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका यांचे वतीने मकर संक्रातीनिमित्ताने चाळकवाडी ( ता जुन्नर) येथील शिवांजली विद्यार्थी वसतीगृहामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप करण्यात आले.महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष डाॅ समीर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीची भावना जपत नेहमीच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात या उपक्रमांपैकीच एक उपक्रम म्हणून चाळकवाडी येथील शिवांजली विद्यार्थी वसतीगृहात शिक्षण घेत असलेल्या
गरीब व अनाथ मुलांना तिळगुळ वाटप करण्यात आले तसेच पत्रकार महासंघाचे खजिनदार डाॅ जालिंदर वाजे व मंगलताई वाजे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी शिवांजली विद्या निकेतनचे मुख्याध्यापक भानुदास चासकर डाॅ जालिंदर वाजे,
गंगाराम औटी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले या प्रसंगी पत्रकार संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष बाबाजी टाकळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत औटी, डाॅ जालिंदर वाजे, गंगाराम औटी, अशोक कोरडे, सुदर्शन मंडले प्रज्योत फुलसुंदर, किशोर वारूळे केतन ताम्हाणे, विजय चाळक,
जुन्नर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ मनोज काचळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वामनशिवांजली विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास चासकर वसतीगृह व्यवस्थापक अण्णासाहेब घुले वसतीगृह अधिक्षक निवृत्ती भांगे आदी मान्यवर उपस्थित होते.