जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय कुरणच्या विद्यार्थ्यांचे ‘आरंभ सीझन 2’ मध्ये लक्षणीय यश

1 min read

कुरण दि.१३:- श्री बालाजी विद्यापीठ, पुणे येथे आयोजित ‘आरंभ सीझन 2’ या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक स्पर्धेत जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय, कुरणच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशासाठी विद्यार्थ्यांना रु. ५००००/- चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.स्पर्धेत “ActonAI” या टीमने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या टीमचे नेतृत्व संज्योत बाळसराफ यांनी केले, तर सदस्यांमध्ये श्रीधर व्हरांबळे, वैष्णवी हिंगे, अस्मिता काशिद , श्रीकांत वाडकर , सिद्धेश रोकडे , आणि सौरभ हेकेरे यांचा समावेश होता.‘आरंभ सीझन 2’ या स्पर्धेमध्ये देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील संघांनी सहभाग घेतला होता. जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य, आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर हा मानाचा टप्पा गाठला.या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी जय हिंद अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जयहिंद कॉम्प्रिहेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, सीईओ डॉ. दत्तात्रय गल्हे, जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, अकॅडेमिक अधिष्ठाता डॉ. व्ही. एम. धेडे , कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स विभागाच्या प्रमुख प्रा. शुभांगी सैद आणि इतर शिक्षक सदस्य उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात जितेंद्र गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत, या यशामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर डॉ. दत्तात्रय गल्हे यांनी त्यांच्या आत्मविश्वास व संघभावनेचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. गरकल यांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचे आणि कष्टाचे कौतुक करत महाविद्यालयाने केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. प्रा. शुभांगी सैद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या विजेत्या संघामध्ये संज्योत बाळसराफ (टीम लीड), श्रीधर व्हरांबळे, वैष्णवी हिंगे, अस्मिता काशिद, श्रीकांत वाडकर, सिद्धेश रोकडे, आणि सौरभ हेकेरे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट टीमवर्कच्या जोरावर हा गौरव संपादन केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाकडून प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेले हे यश केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे, तर जय हिंद कॉम्प्रिहेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण शिक्षण संस्थेसाठी अभिमानास्पद ठरले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे