श्री पांडुरंग वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

1 min read

निमगाव सावा दि.११:- श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत भव्य ग्रंथ प्रदर्शन व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत भव्य ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कविवर्य रवींद्र भोजने (कवी शब्दस्वरा मंगरूळ) हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष निजाम इस्माईल पटेल हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून चव्हाण मॅडम प्राचार्य पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा, इब्राहिम पटेल माजी सरपंच निमगाव सावा, संतोष गाडगे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिमगाव सावा, रहमान पटेल माजी सदर निमगाव सावा, सुनील गाडगे माजी सैनिक, नवनाथ सावकार गाडगे उपाध्यक्ष, बबन जिजाबा गाडगे संचालक, सखाहरी खाडे संचालक, संजय उनवणे संचालक, पीर महम्मद पटेल संचालक, शंकर गाडगे संचालक, निलेश बेहेडे संचालक थोरात, सुनील शेळके टेलर, प्रतिक जावळे, संदीप घोडे, सागर उनवणे, निलेश गाडगे पत्रकार, अनिस पटेल, फोटो ग्राफर, ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे ,साहिल घोडे व बरेचसे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे कविवर्य रवींद्र भोजने यांनी दोन्ही प्रतिमांचे पूजन केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी दोन्ही प्रतिमांचे पूजन केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे कविवर्य रवींद्र भोजने यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. वाचनामुळे माणसाचे जीवन समृद्ध होते तसेच अनेक मोठ मोठ्या व्यक्तींची उदाहरणे देऊन त्यांनी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे असे सांगितले. तसेच त्यांनी पुस्तक नावाची अतिशय छान कविता सर्वांना ऐकवली. तसेच वाचनालयाने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून त्यांचा सत्कार केल्याबद्दल वाचनालयाचे त्यांनी आभार मानले .पंडित नेहरू विद्यालयाच्या प्राचार्य चव्हाण मॅडम यांनी पालकांनी पण वाचले पाहिजे व आपल्या मुलांना पण वाचन करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.तसेच श्री पांडुरंग सार्वजनिक वाचण्यासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके देण्याचे जाहीर केले. व माझ्याकडे वैयक्तिक भरपूर ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रह असल्याचे सांगितले. वाचनालयाने खूप छान उपक्रम राबवला व मला आमंत्रित केल्याबद्दल अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.कार्यक्रमाचे नियोजन वाचनालयाचे अध्यक्ष निजाम पटेल, उपाध्यक्ष नवनाथ गाडगे व संचालक संजय उनवणे ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक संजय उनवणे यांनी केले.व चहा पाणी झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे