राजुरीत टीबीमुक्त मोहिमेला सुरुवात

1 min read

राजुरी दि.१०:- केंद्र आणि राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या टीबीमुक्त भारत मोहिमेअंतर्गत आता 100 दिवसांचा विशेष चाचणी आणि उपचार कार्यक्रम सुरू झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी (ता.जुन्नर) येथे झालेल्या बैठकीत अंगणवाडी व आशा संगिनींना घरोघरी जाऊन तपासणी व उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 100 दिवसांच्या क्षयमुक्ती मोहिमेत आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी आणि आशा संगिनी त्यांच्या भागातील कुटुंबांना भेट दिल्या आणि संभाव्य क्षयरुग्णांची तपासणी केली. ज्या घरांमध्ये आधीच क्षयरोगाचे रुग्ण आहेत, त्या घरांतील कुटुंबांचा तपशील गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली. धुम्रपान करणाऱ्या आणि दारूचे व्यसन करणाऱ्यांसह खोकल्याचा त्रास असलेल्या वृद्धांचीही स्थानिक सीएचसीमध्ये क्षयरोगाची चाचणी मोफत करण्यात येते. चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णावर मोफत उपचार केले जातील. रुग्णाला पोषण आहार म्हणून सरकार दरमहा एक हजार रुपये देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना एक जानेवारीपासून पुढील शंभर दिवसांसाठी विशेष मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहे. या वेळी टीबीमुक्त भारत अंतर्गत 170 एक्स रे मोफत करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे