तरुण शेतकऱ्याने ४ एकरात फुलवली अंजिराची शेती; वर्षाला ५० लाख रुपयांचे उत्पादन
1 min read
दौंड दि.८:- दौंड तालुक्यातील अजित सोमनाथ डोंबे हे आधुनिक शेतीचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहेत. वडीलांनी 35 वर्षांपूर्वी मोजक्या झाडांपासून सुरू केलेल्या अंजीर शेतीला अजित डोंबे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन 4 एकर डोंगराळ जमिनीत समृद्ध अंजीर बाग फुलवली. या शेतीतून ते वर्षाला तब्बल 50 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

हायब्रिड झाडांची निर्मिती :शेतकऱ्यांसाठी बदल घडवणारा उपक्रम मार्केटचा बारकाईने अभ्यास करून अजित डोंबे यांच्या निदर्शनास आले की, फळझाडे लावल्यानंतर फळधारणेसाठी जास्त कालावधी लागतो. यावर उपाय म्हणून त्यांनी हायब्रिड झाडांची निर्मिती केली. त्यांच्या नर्सरीत आंबा, अंजीर, चिकू, पेरू, मोसंबी, नारळ यांसारख्या अनेक फळझाडांची लागवड केली जाते, जी फळझाडे फळधारणेला आल्यानंतरच शेतकऱ्यांना विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना झटपट उत्पन्न सुरू होते.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पोहोच :अजित डोंबे यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील 2000 ते 3000 शेतकऱ्यांना अंजीर शेतीचे रोपे पुरवून त्यांना चांगले उत्पन्न मिळवून दिले आहे. याशिवाय, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, केरळ अशा 8-10 राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या गरजेनुसार झाडे पोहोचवून, शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवडही करून दिली जाते.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक प्रवास :त्यांच्या या आधुनिक संकल्पनेमुळे अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा झाला आहे. अजित डोंबे यांनी दाखवलेली ही मार्गदर्शक वाट इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी ठरली आहे.”आधुनिक शेतीतून लाखोंची कमाई” हे स्वप्न साकार करणाऱ्या अजित डोंबे यांची ही प्रेरणादायी कथा आताच्या पिढीला प्रेरणादायी आहे.