कृषी मंडल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाचट व्यवस्थापनचे दिले धडे

1 min read

निमगांव सावा दि.२६:-निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे शेतकऱ्याच्या ऊस प्लॉटवर जाऊन ऊस पाचट व्यवस्थापन निमगाव सावा येथे कृषी मंडल अधिकारी बेल्हे प्रमिला मडके व कृषी पर्यवेक्षक सिमा गाडेकर यांनी ऊस प्लॉट वर येवुन तुटणाऱ्या ऊसाचे पाचट न जाळता ऊसाच्या पाचटाची कुट्टी करावी असे आवाहन शेतकऱ्यांना केले. त्यापासुन आपल्याला अनेक फायदे होतात असे सांगितले. १० टन ऊसापासून साधारण १ टन पाचटाचे खत मिळते व जमिन भुसभुसीत राहते त्यापासून आपणांस पाण्याची बचत होते व जमिनीमध्ये तन देखील कमी होतात व उत्पन्नामध्ये भरघोस अशी वाढ होते. पाचट कुट्टीनंतर सुपर फॉस्फेट व युरियाचा वापर करावा व उसाच्या बुडख्यांवरील पाचट पंज्याचा सहाय्याने बाजुला करावे असे आवाहन कृषी मंडल अधिकारी बेल्हे प्रमिला मडके व कृषि सहाय्यक पर्यवेक्षिका सिमा गाडेकर यांनी केले. या ऊस पाचट व्यवस्थापन प्रसंगी सुरेखा काटे, उत्तम जाधव, बाबाजी बोऱ्हाडे, गणेश गाडगे, विलास बोऱ्हाडे, किसन महाराज गाडगे, कांताराम गाडगे, माऊली गाडगे, नवनाथ गाडगे, नंदाराम मते, शांताराम काटे, योगेश गाडगे आदी शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे