महावितरणाचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा:- जयवंत घोडके

1 min read

बेल्हे दि.२४:- बिबट्यांचे वाढते हल्ले, रात्री अप रात्री होणारे विंचू व सर्पदंश या घटनांमुळे शेतकऱ्यांची दिवसा वीज मागणी केली आहे. म.रा.वि.वि. कंपनीने बेल्हे उपकेंद्रातून कृषी पंपांसाठी दि.१८ जानेवारी पासून नवीन वेळापत्रकानुसार रात्रपाळी व दिवस पाळीत साडेसहा तास वीज पुरवठा सुरू केला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.

यापूर्वी दोन्ही पाळ्यांमध्ये आठ तास विज पुरवठा केला जात होता. नवीन धोरणानुसार, निर्णयानुसार शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे शेतीसाठी पाणी देण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागेल.

त्यामुळे बेल्हे व परिसरातील सर्व कृषी पंप ग्राहकांच्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आले असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके यांनी दिली. या निवेदन म्हंटले आहे की, अनेक शेतकऱ्यांच्या सामायिक विहिरी, बोरवेल आहेत. त्यांच्या वैयक्तिक पातळीवर पाण्याच्या पाळ्या ठरलेल्या आहेत.

काही शेतकऱ्यांच्या सामायिक पाईप लाईन, उपसा जलसिंचन योजना आहेत. त्यांचे देखील सर्वांचेच शेतीला पाणी देण्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे शेतमालाची मोठी हानी होत आहे. त्याचबरोबर आपत्कालीन दुरुस्ती, गुरुवारची नियमित देखभाल दुरुस्ती यामुळे कृषी वीजपुरवठा मोठ्या कालावधीसाठी बंद राहतो. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे.

नवीन वीज पुरवठा निर्णयाबद्दल शेतकरी अस्वस्थ झाला आहे. रोष व्यक्त करत आहे. सर्व बाबींचा विचार करून पूर्वीप्रमाणे दोन्ही पाळ्यात आठ तास अखंडित वीज पुरवठा येत्या १ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्यात यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत घोडके यांनी केली.

हे निवेदन संतोष तळपे उपकार्यकारी अभियंता आळेफाटा उपविभाग यांनी जयवंत घोडके जुन्नर यांच्या हस्ते स्वीकारले. याप्रसंगी बेल्हे गावचे उपसरपंच राजु पिंगट, जय जवान चे संचालक शिवाजीराव गुंजाळ, पोपटराव संभेंराव, रामा गुंजाळ, भाऊ गुंजाळ व शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे