तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर अजून किती बळी घेणार ?:- खासदार डॉ.अमोल कोल्हे
1 min read
चाकण दि.७:- तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर काल पिंपळे जगताप गावानजीक एका भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी मन सुन्न करणारी असल्याचं खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.
डिसेंबर २०२३ मध्ये या मार्गावरील एलीव्हेटेड कॉरिडॉरची निविदा प्रक्रिया सुरू झाली. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अचानक हा महामार्ग MSIDC कडे हस्तांतरित करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करण्याची वेळ आली.
केंद्र व राज्य सरकारच्या या टोलवाटोलवीत आमच्या जिवाभावाच्या माणसांचा रोज बळी जातोय, याचे गांभीर्य सरकारला नाही हे फार मोठे दुर्दैव आहे.
याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत असून, दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजीही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पत्र लिहून विनंती केली होती.
कालच्या दुर्दैवी अपघातानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पत्र लिहून सदर काम लवकरात लवकर सुरू करावे व अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केली आहे.