पुणे – नाशिक ‘सेमी हायस्पीड’चा नव्याने ‘डीपीआर’

1 min read

पुणे दि.४:- पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा पुणे रेल्वे विभागाकडून नव्याने सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केला आहे. तो रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला आहे. त्याच्या खर्चाबाबत अद्याप काहीही निश्चित नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी दिली.मीना यांनी शुक्रवारी मनमाड ते दौंड या दुहेरी मार्गाची सुरक्षाविषयक पाहणी केली.त्यानंतर त्यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.या वेळी पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक इंदू दुबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला, उपव्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह, वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे आदी उपस्थित होते.नारायणगावजवळील जायंट मोटोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळेच्या कामकाजावर या रेल्वेमार्गाचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सध्याच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. या मार्गाचा पुन्हा ‘डीपीआर’ बनववा, अशा सूचना मध्य रेल्वेला देण्यात आल्या होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे