२ चारचाकी, १७ दुचाकी, ४३ टायर चोरणारे आळेफाटा पोलिसांनी केले गजाआड

1 min read

आळेफाटा दि.६:- आळेफाटा पोलीसांनी पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातुन कार, मोटारसायकल व टायर चोरणारी अट्टल चोरट्यांची टोळी केली जेरबंद याबाबत आळेफाटा पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि.७ ऑक्टोंबर २४ रोजी आळेफाटा पोलिस ठाण्यात श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ (वय ३७ वर्षे रा.आळे यांची मारूती सुझुकी कंपनीची इको कार क्रमांक एम.एच.१२ एम.आर. ६८४३ हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद नोंदवली होती. या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरटयांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे यांना दिले असता त्यांनी तपास चालु केला असताना चोरीस गेलेली मारूती सुझुकी इको कार पारनेर तालुक्यात आढळून आली असता. पोलिसांनी त्यांच्याकडे इको कारबाबत १) शुभम भाऊसाहेब घुले वय २१ वर्षे रा. जांबुत बु. ता. संगमनेर जि. अहिल्या नगर सध्या रा. भांबुर्डी सुपा ता. पारनेर जि. अहिल्या नगर २) आदीत्य सुदाम केदारी वय १९ वर्षे रा. पळशी वनकुटे ता. पारनेर जि. अहिल्यानगर सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि, अहमदनगर यांच्या कडे अधिक चौकशी केली असता. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यांना सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कार चोरी तसेच मोटारसायकल चोरी, टायर चोरीचे पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात २० गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यांनी सदरचे गुन्हे हे ३) रोशन गोरक्षनाथ भवर वय २० वर्षे सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर मुळ रा. समनापुर ता. संगमनेर जि. अहिल्या नगर ४) कृष्णा सोमनाथ शेजुळ सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहिल्या नगर मुळ रा.पिचडगांव ता. नेवासा जि.अहमदनगर ५) आकाश शेंगाळ पुर्ण नाव माहीत नाही सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहिल्या नगर मुळ रा. हिवरगाव पठार ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांचेबरोबर मिळुन केलेले असुन यातील रोशन गोरक्षनाथ भवर वय २० वर्षे सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर मुळ रा.समनापुर ता.संगमनेर जि.अहिल्यानगर यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. तसेच टायरचोरीमध्ये ६) सुनिल सुरेश मधे उर्फ सुनिल रामदास भुतांब्रे वय. १९ वर्षे रा. बांबा वरवडी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर हा सामील असल्याने त्याला सुध्दा टायरचोरीचे गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपी यांची कार चोरी, ट्रायूर चोरी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असुन. त्यांच्याकडुन १ इको कार, १ बोलेरो जिप, १७ मोटारसायकल व ४३ टायर असा एकुण अंदाजे ३१ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्याचे कामी ताब्यात घेण्यात आलेला असुन पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर, गुन्हे अन्वेषण शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, पंकज पारखे, अमित पोळ, संतोष दुपारगुडे, पुरूषोत्तम थोरात, संदीप माळवदे, राजेंद्र हिले, सुनिल गिरी, पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे, नवीन अरगडे, विष्णु दहीफळे, गणेश जगताप, ओंकार खुणे, सचिन कोबल, गणेश सपकाळ, निखील मोरमारे, संतोष साळुंके, भुजंग सुकाळे, किरण शेळके यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे