लाडकी बहीण योजनेतील अर्जांची फेरतपासणी होणार – आदिती तटकरे

1 min read

मुंबई दि.३:- विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा गैरवापर करुन काहींनी पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्याने आता पुन्हा सर्वच अर्जांची फेरतपासणी होणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली.या योजनेसाठी अर्ज केलेल्या काही महिलांचे अर्ज मंजूर होणे बाकी आहे. त्याची छाननी सरकारकडून करण्यात येत आहे. अशातच आता अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता फेरतपासणीमध्ये असे अर्ज आढळून आले तर त्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे