सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री कॉलेज मध्ये वृक्षारोपण
1 min read
राजुरी दि.१:- महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी (ता.जुन्नर) येथे नववर्ष तसेच कॉलेजचे विश्वस्त सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सचिन चव्हाण यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच नवीन वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण केल्यानं त्यांचं परिसरातून कौतुक होत आहे. वृक्ष संवर्धन करणे, वृक्ष जपवणूक करणे, वाढवणे, पर्यावरणाचे समतोल राखणे.
सध्या काळाची गरज असून प्रत्येकाने वाढदिवसानिमित्त किमान एक झाड लावले पाहिजे. असे आवाहन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी कॉलेजचे विश्वस्त सचिन चव्हाण प्राचार्य पी. बलारामडू, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.