डॉ.श्रीपाद सबनीस यांच्या उपस्थितीत राजुरीत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा
1 min read
राजुरी दि.३०:- शांतता, संयम, मानवतावाद, करूणेची शिकवण तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिली. यातूनच बौद्ध धर्म धर्माचा उदय झाला. आज जग आधुनिकतेकडे जात आहे तर दुसरीकडे देशादेशात कलह आहेत ते थांबवण्यासाठी बुध्दांच्या तत्वज्ञानाची आज जगाला गरज आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद सबनीस यांनी राजुरी या ठिकाणी केले.पालि – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वार्षिक शब्दोत्सव उपक्रम लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांणा पुरस्कार दिला जातो.
याहीवर्षी हा पुरस्कार सोहळा राजुरी (ता.जुन्नर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांणा मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी चे अध्यक्ष कृषीभूषण सुदामा भोरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, वल्लभ शेळके, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र भारती, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले, कैलास आवटे, जेष्ठ पत्रकार रविंद्र आवटे, बबन हाडवळे, शाकीर चौगुले, मिलिंद औटी, संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सबनीस म्हणाले की प्राचीन काळात बुध्दांचे विचार, तत्वज्ञान यांचे संकलन पाली भाषेत असल्याने ही भाषा समजावून घेणे गरजेचे आहे तसेच पालकांनी आपल्या मुलांना दररोज वर्तमानपत्रे, ग्रंथ वाचण्यासाठी द्यावीत असे सांगितले.
लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी यावेळी प्रतिष्ठानचे उद्दिष्टे कार्य व आगामी उपक्रम विशद केले. जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभर दरमहा एक, असे १२ ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या शाळांना व शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान च्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार राजुरी येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जि. के. औटी यांना देण्यात आला, उद्योग भुषण पुरस्कार भोसरी येथील उद्योजक मुकूंद आवटे यांना देण्यात आला.
पाली भाषा पुरस्कार इस्लामपूर येथील निवेदिका व व्याख्यात्या मनिषा भोसले यांना देण्यात आला. काव्यसाधना पुरस्कार कोरड्या घशाचा ताळेबंद या कविता संग्रहासाठी कविवर्य इंजि. शिवाजी चाळक यांना देण्यात आला.
काव्यप्रतिभा पुरस्कार रानभैरी कवितासंग्रह कवी संतोष गाढवे यांना देण्यात आला. व मुक्त छंद कवी आत्माराम हारे व काव्य कवी प्रशांत केंदळे यांना देण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिमा गांधी यांनी केले तर आभार प्राचार्य जि. के. औटी यांनी मानले.