धक्कादायक! तिसरी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले
1 min read
परभणी दि.२९:- वंशाला दिवा दिला नाही आणि तिसरीही मुलगीच जन्माला घातली म्हणून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.तिसऱ्यांदाही मुलगीच झाली. तेव्हापासून या पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं व्हायची. 26 डिसेंबरला रात्रीही दोघांमध्ये याच विषयावरुन भांडण सुरू झालं. संतापलेल्या पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि काडी पेटवली. बघता बघता पत्नीसह घरानंही पेट घेतला.
एवढाश्या पत्र्याच्या खोपट्यातून पेटलेली ही महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरावैरा पळू लागील. आणि पळत शेजारच्या दुकानात पोहोचली. आगीच्या विळख्यात सापडलेल्या महिलेला बघून आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोवर ही महिला गंभीररित्या भाजली होती. ती बेशुद्ध पडली.
या सगळ्या आगीत दोन दुकानंही जळाली. गंभीर भाजलेल्या महिलेला स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र तोवर खूर उशीर झाला होता. तिनं तीन मुलींना अनाथ करुन हे जग सोडलं होतं. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत.
मात्र, काही कर्मदरिद्रींना वंशाच दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. या महाभागांना याचंही सामान्य ज्ञान नसतं की मुलगा किंवा जन्माला घालणं हे स्त्रीच्या नाही तर पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असतं. मात्र वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी बाईलाच बळी जावं लागतं.
काळ बदलला, कायदे आले तरी वंशाच्या दिव्याची हाव अजूनही अनेक महिलांची होळी करतेय. या बुरसटेल्या मानसिकतेतून महाराष्ट्र कधी बाहेर पडणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.