बेल्ह्यात बांगलादेशी डॉक्टरला एटीएसने केली अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

1 min read

बेल्हे दि.२८:- आळेफाटा बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन दशकांपासून बेल्ह्यात वास्तव्यास राहून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला दहशतवादी पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली.

असून जुन्नर न्यायालयात हजर केले असता सदर डॉक्टरला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.बेल्ह्यात सुकुमार पंचानन बिश्वास हा बांगलादेशी तरुण १९९० सालापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता. त्याच्याविरुद्ध दहशतवादी पुणे पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सुकुमार बिश्वास व त्याची पत्नी ललिता या दोघांचे पास पोर्ट, व्हिसा, पॅन, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, बँकेचे चेकबुक, पतसंस्था व बँकेच्या खात्याची एटीएम कार्ड त्याने केलेल्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे दहशतवादी पथकाने जप्त केली आहेत.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे