“विशाल फार्मसीमध्ये क्रिडास्पर्धांना उत्साहात सुरुवात”
1 min read
आळे दि.२८:- येथे विशाल फार्मसी महाविदयालयात तीन दिवसीय क्रिडास्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धेची सूरुवात क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन करून करण्यात आली. यंदाच्या क्रिडोत्सवाचे “Sports Fiesta 2k24-25” असे नामकरण करण्यात आले. या उद्घाटनासाठी दशरथ शेवाळे संस्थापक शिवनेर अॅग्रो आळेफाटा, समवेत प्रदिप डुंबरे संचालक विशाल जुन्नर सेवा मंडळ व किसन शेळके सभासद विशाल जुन्नर सेवा मंडळ प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. या प्रसंगी प्राचार्य विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्यु. अँड रिसर्च, आळे डॉ. जाधव एस. एल.,
प्राचार्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डॉ. हांडे आर.ए., प्राचार्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फॉर वूमन डॉ. ताजवे ए. एस. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सरस्वती पूजन करून या अंतर्गत क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
दशरथ शेवाळे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.यानंतर या क्रिडामहोत्सवामध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, बॅडमिंटन, चेस, कॅरम अशा विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.या उपक्रमसाठी संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, सीईओ डॉ. दुष्यंत गायकवाड व विशवस्त यांचे मार्गदर्शन लाभले.