‘हिरा पन्ना’ ऍग्रो सेल्स या नूतन व्यवसायाचे उद्घाटन संपन्न; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
1 min read
बेल्हे दि.२७:- बेल्हे (ता. जुन्नर) येथे ‘हिरा पन्ना’ ऍग्रो सेल्स या नूतन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि.२७ रोजी श्रीमती अंजनी बाई बाळासाहेब घोडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे शुभेच्छा देताना म्हणाले की, घोडके कुटुंबीय शेती व्यवसायात पारंगत असून याच कुटुंबातील उच्च शिक्षित बीएससी ऍग्री झालेल्या तरुणांने बेल्हे व परिसरातील शेतकऱ्यांना फायदा देणारा व्यवसाय सुरू केला आहे.
या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शनाची नितांत गरज असून हे घोडके कुटुंबाच्या वतीने पूर्ण होणार आहे.या नूतन दुकानात सर्व प्रकारचे नामांकित कंपन्यांचे रासायनिक खते, विद्राव्य खते, औषधे, बी-बियाणे, मल्चिंग पेपर आदी योग्य भावात मिळणार आहेत.
उत्तम शेती व दर्जेदार पीक येण्यासाठी (पालेभाज्या, फळभाज्या) यासाठी योग्य व माफक दरात खते व औषधे मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचा वातावरण आहे. यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, कळस गावचे सरपंच राहुल गाडगे,
हभप बाळशीराम महाराज बांगर, मोहन बांगर, सावकार पिंगट,जानकु डावखर, देवराम तट्टू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सारंग घोलप यांसह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या तर माजी पंचायत समिती सदस्य जयवंत बाळासाहेब घोडके,
शामराव बाळासाहेब घोडके, विजय बाळासाहेब घोडके, अनिकेत जयवंत घोडके तसेच समस्त घोडके परिवाराने या उद्घाटनप्रसंगी उपस्थित सर्वांचे स्वागत करून आभार मानले. स्वागत व प्रास्ताविक सूत्रसंचालन विठ्ठल गुंजाळ यांनी केले.