ज्ञानमंदिर हायस्कूलच्या १० वी ब चा स्नेह मेळावा संपन्न

1 min read

आळे दि.२६:- आळे (ता.जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल मधील सन 2001 च्या 10 वी तुकडी ब चा स्नेह मेळावा व सन 2001 च्या 10 वी ब वर्गाचा वाढदिवस त्या वर्गात जाऊन सादर करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन आळे येथील महात्मा फुले पतसंस्थेचे माजी चेअरमन व संचालक सागर गुंजाळ व बँकेतील अधिकारी मयूर यांनी केले होते. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या 5 वी ते 10 वी च्या तुकडी ब प्रत्येक वर्गाला भेट देऊन प्रत्यक्ष वर्गात जाऊन बाकावर बसण्याचा आनंद लुटला. अनेक माजी शिक्षकांची भेट झाली. तसेच ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाने नव्याने बांधकाम करणाऱ्या शैक्षणिक संकुलनासाठी 2001 10 वी ब च्या नावाने मोठी देणगी देणार. असल्याचे सर्वांनी एक मुखाने सांगितले. तसेच सदर स्नेह मेळाव्यात 2001 10 वी ब च्या वर्गातील माजी विद्यार्थी सुरेश कुऱ्हाडे याची ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्या वेळच्या 10 वी तुकडी ब वर्गात जाऊन सत्कार सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमासाठी जुन्नर पंचायत समितीतील अधिकारी सुनीता सुवर्णकार, डॉ. दुर्गा पाटील भुजबळ, डॉ. ओंकार खंडागळे, शिक्षक पुनम वनारसे, योगेश गाढवे, सचिन वायाळ, राणी कुऱ्हाडे उद्योजक मनोज शिंदे, विनोद गुंजाळ, प्रशांत कळमकर, योगेश कोते, दीपक शिंदे तसेच विविध कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणारे मनोज टकले, पराग कुऱ्हाडे, विश्वनाथ गाढवे, संदीप भुजबळ आदी उपस्थित होते. सर्वांना शेवटी पिंपरी पेंढार येथील म्हसवंडी घाटात असणाऱ्या रिसॉर्टला ओ.एन.जी.सी. कंपनीत उच्च पदावर कार्यरत असणारे सम्राट वाव्हळ यांनी भोजन देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे