सीमा डुकरे यांना महाराष्ट्राचा अजिंक्यतारा पुरस्कार जाहीर; निवेदन क्षेत्रातील कार्याचा गौरव
1 min read
औरंगपूर दि.२६:- युवा संग्राम सामाजिक संस्थेचा महाराष्ट्राचा अजिंक्यतारा पुरस्कार २०२५ उत्कृष्ट निवेदिका सीमा डुकरे यांना नुकताच जाहीर झाला आहे.जुन्नर तालुक्यातील औरंगपूर या खेडेगावातील शेतकरी कुटुंबात जन्म झाल्या नंतर विचारांशी आणि संस्कारांशी प्रामाणिक असलेल्या. सीमा वसंत डुकरे यांनी जैवतंत्रज्ञान पदविका संपादन केल्यानंतर नोकरीच्या पाठीमागे न जाता आपली शालेय जीवनापासूनची आवड जोपासत निवेदन क्षेत्रामध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला आणि २०१८ सालापासून निवेदन क्षेत्रामध्ये काम सुरू केले या क्षेत्रात काम करत असताना.
त्यांनी पुणे नगर या भागातून सुरुवात करून राज्यस्तरावर विविध कार्यक्रमांमध्ये आपली निवेदनाची छाप पाडली आहे. काम करत असताना प्रत्येक पावलोपावली त्यांना त्यांच्या आई-वडिलांची मोठी साथ लाभली आहे. आक्रमक धाडसी संस्कारक्षम युवती म्हणून त्यांना ओळखले जाते.
निवेदन क्षेत्रात सीमा डुकरे त्यांनी त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आजच्या युवक युवतींसाठी एक प्रेरणादायी युवती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आत्तापर्यंत २०२४ सालचा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे.
नुकताच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा संग्राम सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्राचा अजिंक्यतारा पुरस्कार २०२५ हा उत्कृष्ट निवेदिका सीमा डुकरे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतकांकडून गौरव होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.
उत्कृष्ट निवेदिका सीमा डुकरे यांना नुकताच महाराष्ट्र अजिंक्यतारा २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला निवेदन क्षेत्रामधील उत्कृष्ट कार्याची दखल घेत सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. हा पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे औरंगपूर या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे सीमा डुकरे यांचे विशेष अभिनंदन होत आहे.