श्री साईकृपा चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

1 min read

बेल्हे दि.२३:- श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्हे (ता.जुन्नर) या संस्थेचा सन २०२५ चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बेल्हे गावातील ग्रामस्थ व सर्व शाखांचे सल्लागार संचालक व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी चेअरमन वसंत जगताप यांनी १४ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या बेल्हे शाखेच्या २३ व्या वर्धापन दिन साजरा होणार असल्याचे सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तसेच सभासद असणाऱ्या महिलांना आकर्षिक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सावकार पिंगट यांनी केले तर आभार सूर्यकांत गुंजाळ पाटील यांनी मानले. यावेळी नेताजी आहेर, शिवाजी पिंगट, आनंदा बेलकर, संतोष शिंदे, संतोष आरोटे, टी. एल गुंजाळ, विलास पिंगट, अमर गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ, प्रभाकर बनकर, किशोर आहेर, सखाहरी तांबे, भास्कर मुंडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे