सोनवणे परिवाराच्या लग्न सोहळानिमित्त प्रसिद्ध गायक आकाश शिंदे यांचा नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम
1 min read
शिरोली दि.२०:- शिरोली (ता. जुन्नर) येथील सोनवणे परिवाराच्या लग्न सोहळानिमित्त प्रसिद्ध गायक आकाश शिंदे यांचा नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,चि. स्वप्निल, सौ. विजया व श्री. रमेश बाळाजी सोनवणे रा. शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर, जि. पुणे यांचे सुपुत्र व चि. सौ. कां. स्नेहा आयु. वैशाली व बु.चंद्रकांत सोन्याबापु रणधीर रा. रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव, जि. अ.नगर यांची सुकन्या यांच्या लग्न सोहळ्या निमित्त पियाताई सातपुते प्रस्तुत स्वामी मल्हार जागरण गोंधळ पार्टी यांचा जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
विशेष आकर्षण
जुन्नर तालुक्यात प्रथमच, महाराष्ट्राचा लाडका आवाज, नाथ भक्ती गितांचा सुरेल आवाज महाराष्ट्राचे लाडके नाथ गायक श्री. आकाशजी शिंदे यांचा नाथभक्ती गितांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती..!!
कार्यक्रमाची वेळ
बुधवार दि.२५/१२/२०२४ रोजी सायं ६.०० वा
स्थळ : यशोदिप-देवांश, मळगंगा माता मंदीराजवळ शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर, जि. पुणे
निमंत्रक : समस्त सोनवणे परिवार आप्तेष्ठ व नातेवाईक
छोटे निमंत्रक:- कुमार देवांश हर्षल सोनवणे