बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे बेपत्ता; पोलिसांचा तपास सुरू
1 min read
बेल्हे दि.६:- बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे (रा.तांबेवाडी ता.जुन्नर) काल दि.५ रात्री पासून बेपत्ता असल्याची तक्रार आळेफाटा पोलिसात देण्यात आली असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
सविस्तर माहिती अशी की, तांबेवाडी (ता. जुन्नर) येथील किशोर तांबे हे काल (दि.५) पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे चुलत भाऊ संतोष तांबे (वय 42 रा. तांबेवाडी, ता. जुन्नर) यांनी दिली आहे. संतोष तांबे यांनी आळेफाटा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी काल रात्री दूध घालण्यासाठी समर्थ दूध डेअरी मध्ये गेलो असता तिथे माझं किशोर तांबे यांच्याशी बोलणं झालं. ते व मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांची बजाज डिस्कव्हर MH-15-CN 9228 घेऊन ते रात्री आठ वाजता शेतात जातो असे सांगून गेले होते.
आज दि.६ सकाळपर्यंत किशोर हे घरी न आल्याने आम्ही शेतामध्ये जाऊन इतरत्र शोधाशोध केली. रोडवर, शेतात त्यांची मोटार सायकल पाहिली परंतु मोटरसायकल कुठेही दिसून आली नाही. शेतात जातो म्हणून घरी सांगून गेले परंतु अद्याप घरी आले नसल्याने त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी तक्रार आज दि. ६ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता आळेफाटा पोलीस देण्यात आली आहे. यावरून आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पोलिसांनी दिलेले नाव व वर्णन :- मिसिंगचे नाव-किशोर कोंडिभाउ तांबे (वय 40 वर्ष) रा.तांबेवाडी ता.जुन्नर जि.पुणे. वर्णन:- उंची 5 फूट 7 इंच, रंगाने गोरा, अंगात निळे रंगाची जीन्स पॅन्ट, व पिवळसर रंगाचा शर्ट, चेहेरा
उभा , नाक सरळ, केस काळे, पायात चप्पल घातलेली आहे.सदर व्यक्ती व दुचाकी आढळल्यास आळेफाटा पोलिसांना 9588609911 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.