नारायणगाव आगारातून १३ दिवसांत १ लाख महिलांनी घेतला ५० % सवलतीचा फायदा

1 min read

नारायणगाव दि.३१ :- महिलांना ५० टक्के एसटी प्रवासात सवलत राज्य सरकारने जाहीर केली आहे. यानंतर नारायणगाव (ता. जुन्नर) आगारातील एसटी बस मधून १३ दिवसांत १ लाख ५ हजार ९९९ महिलांनी या सवलतीचा फायदा घेतला आहे.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येतात. यानंतर आता दिनांक १७ मार्च पासून परिवहन महामंडळाच्या सर्वच बस मध्ये महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजना सुरू झाली. १७ ते २९ मार्च या १३ दिवसात नारायणगाव आगार तर्फे मधील एक लाख पेक्षा जास्त महिलांनी या सवलतीचा लाभ घेतला अशी माहिती नारायणगाव आगार वाहतूक निरीक्षक साधना कालेकर यांनी दिली.


ग्रामीण भागातील महिला कामानिमित्त मोठ्या संख्येने इतर ठिकाणी जात असतात तसेच सर्वसामान्य नागरिकांना लाल परी प्रथम प्रवासाचे साधन आहे. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्याच्या अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना महिलांना सन्मान योजनेअंतर्गत ५० टक्के सवलतीची घोषणा केली होती. त्याचा फायदा महिलांना होत असून खाजगी गाड्यांना चा वापर यातून कमी होऊन इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे इंधन बचत झाल्यास देशाची ही आर्थिक बचत यातून होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे