लाडकी बहीण योजनेचा’ डिसेंबर चा हफ्ता अधिवेशन संपल्यानंतर:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

नागपूर दि.१९:- जनतेला आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच ज्या ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत, त्यातील एकही योजना बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन देखील फडणवीसांनी दिले.

ते विधानसभेत बोलत होते. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यावर टाकणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, लाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष काही नाहीत. योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर ते तपासणं गरजेचं आहे. कारण हा जनतेचा पैसा आहे. समाजात चांगल्या प्रवृत्तीसारख्याच वाईट प्रवृत्ती देखील असतात.

आम्ही शेतकरी असतील, युवा असतील, वंचितांच्या संदर्भातील योजना असतील, ज्येष्ठांच्या संदर्भातील सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे