ज्ञानराज स्कूल येथे विद्यार्थी व पालकांना शारीरिक व मानसिक आरोग्य समुपदेशन मार्गदर्शन

1 min read

आळेफाटा दि.१३:- ज्ञानराज ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित , ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आळे येथे डॉ. योगेश्री कणसे (त्वचा रोग तज्ञ) व डॉ. निखिल कणसे (मानसोपचार तज्ञ) यांनी विद्यार्थी व पालक यांना शारीरिक व मानसिक ताण का येतो ते येऊ नये व आले. तर दैनंदिन जीवनात काय उपाय करावे यावर मार्गदर्शन केले विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या शंकांचे निरसन केले व विद्यार्थ्याना तणाव रहित विविध परीक्षांना सामोरे कसे जावे याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नेताजी डोके, सचिव दिलीप वाव्हळ, सहकार्याध्यक्ष प्रसन्न डोके, शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधीर वाव्हळ, डॉ. ज्योती पवार, मीना भुजबळ, उमेश शिंदे, गणेश गुंजाळ, सुनील जाधव तसेच प्राचार्य जी.बी. बोऱ्हाडे आणि शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सोनवणे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे