शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे प्रतिबंधात्मक आदेश

1 min read

शिक्रापूर दि.१२:- कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम १ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत असून पुणे जिल्ह्यात ३० डिसेंबर २०२४ च्या रात्रीपासून २ जानेवारी २०२५ पर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी लागू केले आहे.

Oplus_131072

कोरेगाव भीमा येथे दि.१ जानेवारी २०२८ रोजी घडलेल्या हिंसाचार नंतर प्रशासन दरवर्षी विशेष खबरदारी घेत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

Oplus_131072

सदर आदेशामध्ये आदेशानुसार त्या कालावधीत कोणत्याही व्यक्तीला इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय तेढ पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. तर या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहिल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे