विजेच्या तारा चोरी करणा-या ०५ सराईत आरोपींना जुन्नर पोलिसांनीकडून अटक; ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

1 min read

‏जुन्नर दि.१०:- जुन्नर पोलीस स्टेशन हद्दित नेतवड ते नाणेघाट दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपणी चे ४००KV अतिउच्च दाबाची लाईनचे अॅल्युमिनीअमच्या तारा चोरी करणा-या ०५ सराईत आरोपींना जुन्नर पोलिसांनी अटक करुन ६,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Oplus_131072

या बाबत जुन्नर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपणी चे ४०० केव्ही बाभळेश्वर ते कुडूस असे दुहेरी परिपथ वाहीणीचा मुंबईला विदयुत पुरवठा करण्यासाठी चालु असलेल्या कामकाजातील जोडलेल्या अॅल्युमिनीअमच्या तारा हया मनो-यावरुन तोडुन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करुन. व जवळपास ०८ टण तारा कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरी करुन घेवुन गेल्याने त्याबाबत सुरेश नंदलाल प्रसाद, (वय ५३ वर्षे, व्यव. नोकरी, कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल लि. तर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण, रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

Oplus_131072

अॅल्युमिनीअमच्या तारा चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी साध्या वेशात तसेच सरकारी वाहनातुन गणवेशात पेट्रोलॉग सुरु करून घडलेले गुन्हे उघडकिस आणण्यासाठी तपास पथकास सुचना दिलेल्या होत्या.सदरचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना दिलेल्या सुचनांप्रमाणे सि.सि.टि.व्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे चाकण व आळंदी येथील आरोपी नामे १. अविनाश लक्ष्मण कोळेकर रा. हनुमानवाडी, चाकण आळंदीरोड, ता. खेड, जि. पुणे, २. माधव रोहिदास गिते, रा. बंगलावस्ती, चाकण, ता. खेड, जि. पुणे, ३. आकाश श्रीराम आढे, रा. बंगलावस्ती, चाकण, ता. खेड, जि. पुणे, ४. शिवशंकर मारूती हळदेकर, रा. बंगलावस्ती, चाकण, ता. खेड, जि. पुणे ५) चंद्रशेखर लौदुराम हरिजन, रा. गवतवस्ती, आळंदी फाटा, ता. खेड, जि. पुणे. यांना दाखल गुन्हयाचे अनुषंगाने ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना दिनांक ०५/१२/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो एम एच १४ जी यु ०९६८ व एक बजाज कंपनीची पल्सर एन एस १२५ सीसी भगव्या व काळया रंगाची तिचा रजि नं. एम एच १४ एल आर ९९४७ जप्त करण्यात आली आहे. तसेच अॅल्युनिनिअम तारा अंदाजे ०२ टन वजनाच्या असा एकुण ६,५०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगीरी पंकज देशमुख पोलीस (अधीक्षक, पुणे ग्रामीण), रमेश चोपडे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), रविंद्र चौधर, (उपविभागीय पोलीस अधिकारी), जुन्नर उपविभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रुशिकेश तिटमे, पो.ना सागर हिले, पो.कॉ दादा पावडे, पो.कॉ गणेश शिंदे यांनी केली आहे. सदर गुन्हयाच्या तांत्रीक विश्लेषनाकरीता मा. पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर, पो. हा सुनिल कांळी, पो. कॉ. चेतन पाटील सर्व नेम. सायबर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी मोलाने सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील अधिकना तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे व पो.कॉ गणेश शिंदे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे