अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार; एकास २० वर्षे सक्तमजुरी ची शिक्षा

1 min read

जुन्नर दि.१०:- शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे अल्पवयीन ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा खेड (राजगुरूनगर) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी मंगळवारी (दि.९) ठोठावली.कपिल ऊर्फ जालिंदर मनोहर नायकोडी (वय ३२ रा तेजेवाडी, शिरोली बुद्रुक, ता. जुन्नर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. (दि.१) जानेवारी २०२२ रोजी पीडित ११ वर्षीय मुलगा व्यायामशाळेत व्यायामासाठी गेला होता. तो एकटा व्यायाम करताना आरोपी तेथे आला. त्याने व्यायामशाळेचा दरवाजा आणि खिडक्या लावून घेतल्या. आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. पीडितेच्या पालकांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार कपिलवर गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए एस पाटील यांनी आरोपीस अटक केले होते.हा खटला न्यायाधीश एस. पी. पोळ यांच्या पुढे सुरू होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी अभियोक्ता विवेक देशपांडे यांनी ९ साक्षीदारांची साक्ष घेतली. तर बचाव पक्षाच्या वतीने २ साक्षीदारांची साक्ष झाली. पीडित मुलगा आणि डॉक्टरांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीला दोषी धरले. पोलीस कामकाजात हवालदार महेश भालेराव यांनी यांनी मदत केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे