आळेफाटा ‘विघ्नहर सुपर शॉपी’ लकी ड्रॉ सोडत; भाग्यवान विजेत्यांना मिळाले लाखोंची बक्षीसे

1 min read

आळेफाटा दि.९:- जुन्नर तालुक्यातील नंबर १ स्थानावर असणाऱ्या आळेफाटा येथील विघ्नहर सुपर मार्केटच्या दिवाळी स्पेशल सर्वात मोठ्या ऑफरचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या वस्तूंची बक्षीसे ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस activa स्कूटर पिंपळवंडीचे भाग्यवान ग्राहक संजय वामन यांना मिळाले, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस फ्रिज सोपान कोळेकर, तृतीय क्रमांकाचे बक्षीस वॉशिंग मशीन चंद्रकांत गाडगे यांना, चौथे बक्षीस ओव्हन आर्यन हडवळे यांना मिळाले. यांसह ५ गोल्ड कॉइन, १० मिक्सर, २० सिल्वर कॉइन अशा अनेक बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्राहकांनी या स्कीमला भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. उपस्थित सर्वांचे आभार विघ्नहर सुपर मार्केटचा चे सर्वेसर्वा शुभम ढमाले यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे