समर्थ गुरुकुल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेत ४१६ विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग

1 min read

बेल्हे दि.७:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल या सीबीएसई मान्यता प्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेची वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण आणि दिमाखदारपणे पार पडली. स्पर्धेची सुरुवात दिपप्रज्वन व प्रतिमापूजनाने करण्यात आली.

समर्थ शैक्षणिक संकुलाच्या संचालिका सारिका शेळके यांच्या शुभहस्ते गुरुकुलच्या क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी छोट्या बालचमुंनी पांढरा, हिरवा, लाल,पिवळा,निळा अशा वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे हातात घेत संचलन परेड करून क्रीडा ध्वजाला मानवंदना दिली.क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडास्पर्धांसाठीचे नियम व अटी याबाबत एक शपथ घेण्यात आली.खेळासाठी भलताच उत्साह आणि स्फूर्ती या लहानग्यांमध्ये संचारली होती. खिलाडूवृत्ती आणि जिद्द या दोन गोष्टी अंगिकारण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.आपल्या चिमुरड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी पालकवर्ग देखील उपस्थित होता. नर्सरी,ज्युनियर केजी,सिनियर केजी व पहिलीपासून ते १२वी पर्यंतचे सर्वच विद्यार्थी यात सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पॉम पॉम,स्टार,रिंग,एरोबिक्स,डंबेल,लेझीम अशा वैविध्यपूर्ण नृत्य कलाविष्काराने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.यानंतर बेडूक उडी,धावणे,रिले,चमचा लिंबू,लंगडी शर्यत, कबड्डी,खो-खो,भालाफेक,गोळाफेक,लांब-उडी,टग ऑफ वॉर,कुस्ती आणि योगा इ.सारख्या अनेक मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.प्रत्येक सामने चुरशीचे होत होते.विद्यार्थी अगदी मन लावून आपल्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्यांचे या ठिकाणी प्रदर्शन घडवत असल्याचे दिसून आले.या स्पर्धांचे नियोजन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिक डॉ.राजाभाऊ ढोबळे,सुरेश काकडे,मोनिका चव्हाण,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी सूत्रसंचालन रामचंद्र मते यांनी तर आभार वैशाली सहाणे यांनी मानले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य सतिश कुऱ्हे,पर्यवेक्षक सखाराम मातेले,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,आय टी आय चे प्रा.पांडुरंग हाडवळे,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशालीताई आहेर, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉ.रमेश पाडेकर, यशवंत फापाळे,पराशर कृषी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज हाडवळे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालकवर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे