श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगकडे जाणारे रस्ते दुपदरी कामासाठी ₹ २३४९.३२ कोटी मंजूर
1 min read
मंचर दि.७:-पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६० वरील भीमाशंकर तळेघर-वाडा-राजगुरूनगर आणि जुन्नर-घोडेगाव-तळेघर या दोन विभागांच्या पेव्हड शोल्डरसहित इंटरमिडिएट लेनपासून २-लेन रुंदीकरण, पुनर्बांधणी व अपग्रेडिंगसाठी २३४९.३२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.या विभागाचे आजी माजी खासदार म्हणून सन २०१४ पासून केंद्रीय भारतमाला ज्योतिर्लिंग जोडणी योजनेतून या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून.
देण्याबरोबरच केंद्र शासनाचा निधी मिळवण्यासाठी दोघांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला.१२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व जुन्नर शहराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला ऐतिहासिक शिवनेरी किल्ला हे या रस्ते प्रकल्पातील महत्त्वाचे दुवे आहेत.
या प्रकल्पामुळे अष्टविनायक मंदिरांपैकी श्री क्षेत्र ओझर येथील श्री गणेश मंदिर, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, डिंभे धरण आणि चासकमान धरण यांच्याशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांच्या रोजगारात वाढ होईल.