जिथे प्रतिकुल परिस्थिती असते तिथेच गुणवत्ता सिद्ध होते:- गोविंद शिंदे प्रांताधिकारी

1 min read

आणे दि.४:- श्री क्षेत्र आणे येथे पठार विकास संस्थेच्या वतीने जुन्नर उपविभागाचे प्रांत गोविंद शिंदे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष विनायक आहेर हे होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे हे प्रथम वर्ष आहे अशी माहिती खजिनदार तुषार आहेर यांनी दिली.या सत्कार समारंभ प्रसंगी पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते, सचिव विराज शिंदे, शिंदेवाडी गावचे सरपंच अजित शिंदे, आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, शा.व्य.समितीचे अध्यक्ष बंडू आहेर, जयराम दाते, सुहास नांगरे, सरदार पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता सोनटक्के यांचेसह दोन्ही शाळांचे सुमारे पाचशे विद्यार्थी उपस्थित होते.इ.१० वी व १२ वी मध्ये नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देवून पठार विकास संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. राज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान संघ पुरस्कार प्राप्त अध्यापक तुषार आहेर, आंबेगाव तालुका स्तरीय गुणवंत शिक्षिका सोनल झावरे, जुन्नर तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक अरूण बर्डे, सुरेश कदम यांचा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन विराज शिंदे यांनी केले तर आभार अजित शिंदे यांनी मानले.

चौकट –

”मी,ज्या सिन्नर तालुक्यातून आलोय जिथे निसर्गानं कायमच हात आखडता घेतलेला आहे, दुष्काळी परिस्थिती, पण माझा अनुभव सांगतो की, जिथे प्रतिकुल परिस्थिती असते तिथेच गुणवत्ता सिद्ध होते आणि त्याचीच प्रचिती आणे पठारावर दिसून येत आहे.इथं बुद्धिमत्तेची चुणूक दाखवीत तब्बल ५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी १०वी च्या परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत हे या पुरस्कार वितरण सोहळ्यात दिसून येत आहे.एमपीएससी – युपीएससी च्या परीक्षा देवून येथील विद्यार्थ्यांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न उरी बाळगावं, उत्तरोत्तर यश संपादन करावे”.

गोविंद शिंदे
प्रांताधिकारी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे