नारायणगाव, निमगाव सावा कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची कारवाई
1 min read
निमगाव सावा दि.६:- जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव व निमगाव सावा येथे आकस्मितपणे काही कृषी सेवा केंद्रांना उपविभागीय कृषी अधिकारी संजय शिरसाठ यांनी भेटी देऊन तपासणी केली.
शिरसाठ यांनी नारायणगाव येथे वायकर कृषी सेवा केंद्र, हर्षली कृषी सेवा केंद्र व कृषीशक्ती सेवा केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली. निमगाव सावा येथे जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र, श्री श्री कृषी सेवा केंद्र व सर्वज्ञ कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता
काही कृषी सेवा केंद्रामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आल्या त् त्यामध्ये स्टॉक बुक अपडेट न ठेवणे औषधे व खताचे स्रोत प्रमाणपत्र न ठेवणे, औषधे व खताचे भाव फलक अपडेट न करणे याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
निमगाव सावा येथील जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र येथे काही कालबाह्य औषधे व प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आढळून आले आहेत त्याबाबत त्यांना कारणे दाखा नोटीस देऊन आठ दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. जर समाधानकारक उत्तरे मिळाली नाही तर त्यांचे परमिट निलंबित होऊ शकते.अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी संजय शिरसाठ यांनी दिली.