चंपाषष्ठी सोहळ्यानिमित्त रानमळा येथे श्री कुलस्वामी खंडेरायाची चरित्र कथा 

1 min read

बेल्हे दि.२९:- रानमळा (ता. जुन्नर) येथे चंपाषष्ठी सोहळा निमित्त श्री कुलस्वामी खंडेरायाचे चरित्र कथा शनिवार दि.३० नोव्हेंबर ते शनिवार दि. ७ डिसेंबर या काळामध्ये मध्ये संपन्न होणार आहे.या सोहळ्याचे चौथे वर्ष असून आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचल असणार आहे.

यामध्ये श्री कुलस्वामी खंडेरायाची चरित्र कथा रोज सायंकाळी ६:३० ते ९:३० या वेळेत होणार आहे व त्यानंतर महाआरती संपन्न होणार आहे. शनिवार दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता खंडोबा देवाच्या पालखीची भव्य मिरवणूक होईल, ९ वाजता खंडोबा देवाचे मांडव डहाळे, १० ते १२ वाजेपर्यंत हभप डॉ. गजानन महाराज काळे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद होईल.

दुपारी २ ते ६ तळी भंडार, रात्री ८ वाजता खंडोबा देवाचा छबिना व मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. सर्व भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ रानमळा व मुंबईकर,पुणेकर मंडळी यांनी केले आहे. अशी माहिती पप्पू गुंजाळ यांनी दिली. तसेच कीर्तन श्रवण करणाऱ्या भाग्यवान श्रोत्यांना दोन भागवत कथा सार प्रती मोफत दिल्या जाणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे