पेट्रोल पंपावर या ९ गोष्टी मिळतात मोफत; ९० टक्के लोकांना माहीतच नाही

1 min read

पुणे दि.२९:- पेट्रोल पंपावर खालील ९ गोष्टी ची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. पंप चालकांना ग्राहकांसाठी त्या बाबींचे पालन करणे/ देणे आवश्यक असते.१) पेट्रोल पंपावर तुम्ही तुमच्या वाहनात हवा भरू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ते पूर्णपणे मोफत आहे. त्यासाठी पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक एअर फिलिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. ज्यासाठी एक कर्मचारी असतो.२) पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात येते. त्यासाठी पेट्रोल पंपांवर आरओ किंवा वॉटर कुलर बसवले जातात.३) पंपावरील वॉशरूमची सुविधाही सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे. ते कोणीही वापरू शकतो. यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत.४) आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही पेट्रोल पंपावरून फ्री कॉल करू शकता. पेट्रोल पंप मालकांना ही सुविधा द्यावी लागते.५) याशिवाय पेट्रोल पंपावर फर्स्ट एड बॉक्स ठेवणेही आवश्यक आहे. ज्यामध्ये आवश्यक औषधे आणि मलम असतात. जे एक्सपायर्ड असू नयेत.६) पेट्रोल पंपावर इंधन भरताना वाहनाला आग लागली तर तुम्ही येथे फायर सेफअटी डिव्हाइसचा वापर करु शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.७) पेट्रोल पंपावर नोटीस असावी. ज्यावर पंप उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ लिहिलेली असते. रजेबाबतही माहिती द्यावी लागेल.८) येथे पेट्रोल पंप मालकाचे नाव, कंपनी आणि संपर्क क्रमांक देखील लिहावा लागेल. जेणेकरून लोक गरज पडल्यास पेट्रोल पंपाशी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधू शकतील९) तुमच्या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी तुम्हाला बिल देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही. बिलाचा फायदा असा आहे की काही चूक झाली तर ती दुरुस्त करता येते.कोणत्याही पेट्रोल पंपावर या सुविधा मोफत मिळत नसतील किंवा त्यावर शुल्क आकारले जात असेल, तर तुम्ही त्याबाबत तक्रारही करू शकता. तुम्ही pgportal.gov पोर्टलवर किंवा पेट्रोल पंप मालकाकडे तक्रार करू शकता. तुम्ही पेट्रोलियम कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन नंबर आणि मेल आयडी मिळवू शकता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे