वडगाव आनंदला राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत धावले ३२५ बैलगाडे

1 min read

आळेफाटा दि.२९:- श्री कळमजाई मातेच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने भव्य अशा राज्यस्तरीय बैलगाड्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव आनंद, मोरदरा, पादीरवाडी (ता. जुन्नर) येथील श्री कळमजाई मातेच्या यात्रोत्सवाच्या या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पेया स्पर्धेत पुणे, ठाणे, नगर, नाशिक तसेच सातारा जिल्ह्यातील जवळपास ३२५ बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पहिल्या दिवशी प्रथम क्रमांकात ७७ बैलगाडे धावले. यात फळीफोड शुभम प्रकाश गोरे, चैतन्य महेंद्र बोडके यांच्या बैलगाड्याने केली. दुसऱ्या क्रमांकात १०४ बैलगाडे धावले व यामध्ये फळीफोड अविनाश पाटील बुवा नवले, सुरज टाकळकर, संकेत शिंदे जुगलबंदी यांच्या बैलगाड्याने केली. तर तिसऱ्या क्रमांकात ३७ बैलगाडे धावले व रामदास दादा गाढवे यांच्या बैलगाड्याने फळीफोड केली. तसेच चतुर्थ क्रमांकात ५२ बैलगाडे धावले. यामध्ये पप्पूदादा मित्र मंडळ बोरी, सिद्धेश प्रतीक लोखंडे यांचा बैलगाड्याचा आला. चतुर्थ क्रमांकात ३२ बैलगाडे धावले व यामध्ये सोमनाथ काशिनाथ चौगुले, पप्पूदादा मित्र मंडळ व सिद्धनाथ जाधव जुगलबंदी बैलगाड्याचा आला. तसेच तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी विठ्ठल तुकाराम देवकर व धनंजय बटवाल जुगलबंदी यांचा बैलगाडा घाटाचा राजा ठरला व तिसऱ्या दिवशीचा घाटाचा राजा नानासाहेब महादेव गुळवे व प्रथमेश महादेव नवले यांचा बैलगाडा ठरला. तर वीस फुटांवरून विष्णू बाबुराव हस्ते व पप्पूदादा मित्र मंडळ, रमेश देवराम गावडे यांचा बैलगाड्याचा आला. तीन दिवस चाललेल्या भव्य अशा राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस १ लाख ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकांसाठी ७५ हजार ५५५ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५५ हजार ५५५ रुपये आहे. अंतिमसाठी एक मोटार सायकल, दोन बैलांची जोडी, एक गाय, एक सोन्याची अंगठी, फ्रीज, पिठाची चक्की, टीव्ही, जुपता गाडा, सायकल, पंखा, कुलर, फिल्टर, गिझर, मिक्सर आदी बक्षिसे देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे