खाजगी दूध संघांनी दूध दरामध्ये केलेली कपात तात्काळ मागे घ्या:- शेतकरी संघटना

1 min read

जुन्नर दि.२९:- खाजगी दूध संघांनी दूध दरामध्ये तीन रुपयांनी कपात केली तात्काळ मागे घ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर पन्नास रुपये दर द्या नाहीतर जुन्नर तालुक्यात मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा अखिल भारतीय शेतकरी संघटना पुणे अध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील यांनी दिला आहे.गोकुळ दूध संघ वारणा दूध सांगासह खाजगी दूध संघांनी घेतला मोठा निर्णय; दूध खरेदी दरामध्ये तीन रुपयांची कपात, त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड रोष वाढला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहेत.महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निराशा जनक निर्णय घेण्यात आलेला आहे. गोकुळ वारणासह अन्य खाजगी दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरामध्ये तीन रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला असून, भविष्यकाळामध्ये अखिल भारतीय शेतकरी संघटना दूध उत्पादक गवळ्यांना घेऊन. दूध संघ विरुद्ध व शासनाविरुद्ध रस्त्यावर उतरूण तीव्र संताप व्यक्त केला जाईल.जुन्नर तालुक्यातील छोट्या मोठ्या दूध डेऱ्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना २५ ते २८रुपये प्रति लिटर दर मिळत असल्यामुळे दूध गवळी सांगत आहेत गाई सांभाळण्यासाठी दहा गायांसाठी दोन मजूर लागत आहे. महिलेला तीनशे रुपये रोज तर पुरुषाला पाचशे रुपये हजेरी द्यावी लागते रतीब चारा औषधोपचार खर्च धरता प्रति लिटर उत्पादन खर्च २५ रुपये येत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.व गायी खरेदीसाठी घेतलेले कर्ज भरू शकणार नाही.पुढील काळामध्ये दूध उत्पादक शेतकरी मोडकळीस येणार आहे.गोकुळ वारणासह खाजगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरामध्ये तीन रुपयांची कपात केली आहे. आता गाय दूध खरेदी दर प्रति लिटर ३३ रुपयांऐवजी ३० रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दूध खरेदी दरातील कपातीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होईल. या निर्णयामुळे शेतकरी अत्यंत निराश असून, त्यांना या निर्णयाचा फटका बसणार असल्याचे दिसते.शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर मिळत नसल्यामुळे दूध संघ आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रभाव पडेल, असे म्हटले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, त्यांना आपल्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळत नाही आणि हे दर कमी करणे त्यांच्या परिश्रमांचे मूल्य कमी करणारे आहे.दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ, वारणा, राजारामबापू या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी सुद्धा गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ दूध ३० रुपये लिटरने खरेदी केलं जाईल.मात्र प्रत्यक्षात दुध गवळ्यांना २५ते२७ रुपये दर प्रति लिटर मिळत आहे तर थेट तीन रुपयांना कात्री लावल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तगडा झटका बसला आहे. गाय दूध पावडर, लोणी, दुधाचे बाजारातील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत राहत आहे.थेट तीन रुपयांना कात्री लावल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तगडा झटका बसला आहे. गाय दूध पावडर, लोणी, दुधाचे बाजारातील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत राहत आहे.गाईच्या दुधाला प्रति लिटर ५० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ७५ रुपये दर द्यावा व खाजगी दूध संघाने प्रति लिटर दुध दरामध्ये तीन रुपये कपात केली आहे.ती तात्काळ मागे घ्यावी.अन्यथा पुढील काही दिवसांमध्ये दूध उत्पादक गवळ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. असा इशारा अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ भांबेरे,पुणे जिल्हा महिला अध्यक्ष वर्षाताई गुंजाळ,युवा अध्यक्ष राहुल जेजुरकर, शेतकरी प्रतिनिधी अनिलदादा गावडे,कार्याध्यक्ष प्रवीण डोंगरे,विभागीय अध्यक्ष विक्रम सोलाट पाटील यांनी दिला आहे.

——-
प्रतिक्रिया १

“एक गाईसाठी पशुखाद्य चार किलो कमीत कमी द्यावे लागते त्याला खर्च ६० रुपये येतो चारापाण्यासाठी सरासरी १२० ते १५० रुपये एवढा खर्च येतो . औषधोपचार खर्च , मजूर खर्च , लाईट बिल खर्च हे सर्व खर्च धरले तर ४०० रुपये दररोज एका गाईला खर्च येतो.साधारणपणे एक गाई १२ ते १५ लिटर दूध देते.जुन्नर तालुक्यामध्ये दूध उत्पादकांना २५ ते २७ रुपये लिटरला भाव मिळतो. २७भावाप्रमाणे शेतकऱ्याला एका गाईचे उत्पन्न दररोजचे चारशे रुपये मिळते. त्यामुळे शिल्लक काहीच राहत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या ५०% नफा ह्या सूत्रानुसार गाईच्या दुधाला ५० रुपये व म्हशीच्या दुधाला ७५ रुपये भाव मिळाला तरच,दूध उत्पादक शेतकरी टिकेल नाही तर,महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील.”

प्रमोद खांडगे पाटील
अध्यक्ष पुणे अखिल भारतीय शेतकरी संघटना
———-
प्रतिक्रिया 2

“माझ्याकडे दुगत्या दहा गाईंचा गोठा आहे. खुराकासाठी सरकी पेंड,हरभरा चुनी,गहू भुस्सा यासाठी तीस हजार रुपये महिन्याला लागतात.गिन्नी गवत, वैरण, ऊस, वाडे, कडब्यासाठी महिन्याला वीस हजार. चारा बारीक करण्यासाठी कुट्टी मशीनची आवश्यकता असते.त्यासाठी लाईट बिल व गोठ्यातील बिल यासाठी पाच हजार रुपये खर्च येतो. गोठा व्यवस्था पाहण्यासाठी एक जोडपे आहे .महिलेला नऊ हजार रुपये तर पुरुषाला पंधरा हजार रुपये महिन्याला पगार द्यावा लागतो.सर्व उत्पादन खर्च ८० हजार रुपये महिन्याला येतो.दररोज ९० ते १०० लिटर दूध डेअरीला जाते. महिन्याकाठी ३००० लिटर दूध डेअरीला जाते .सध्या सत्तावीस रुपये प्रति लिटर दर मिळतो.८० ते ८५ हजार रुपये एवढा पगार महिन्यासाठी येतो परंतु उत्पादन खर्च वजा जाता.शेना शिवाय काही शिल्लक राहत नाही.त्यामुळे दूध धंदा परवडत नाही.कमीत कमी गाईच्या दुधाला पन्नास रुपये बाजार भाव मिळायला पाहिजे.तेव्हाच दूध धंदा परवडेल.”

विक्रम सोलाट पाटील
दूध उत्पादक शेतकरी
गुंजाळवाडी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे