आळेफाटा येथे रविवारी होणार मराठा वधू-वर परिचय मेळावा
1 min read
आळेफाटा दि.२९:- पुणे जिल्ह्यातील सगेसोयरे विवाह संस्था व सकल मराठा समाज यांच्या वतीने सलग दहाव्या वर्षी आळेफाटा (ता. जुन्नर) येथील श्रीसावता महाराज मंदिर, कल्याण रोड, आळेफाटा (जि. पुणे) येथे रविवार दि.१ डिसेंबर रोजी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने यंदा कर्तव्याच्या दृष्टीने उत्सुक मराठा विवाहच्छ्रेक वधू-वर व त्यांच्या नातेवाईकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सगेसोयरे विवाह संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.मुलं वयात आली आणि उद्योग व्यवसायात रमली, की पालकांचा शोध त्यांना जोडीदार शोधण्यासाठी सुरू होतो.
पण हल्ली माणसाकडे आपल्या उद्योग व्यवसाय नोकरीतील धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात माणसांना वेळ ही अमूल्य गोष्ट झाली आहे. या सर्व अडचणी दूर करून समाज बांधवांनां एका व्यासपीठाखाली आणून त्यांचा जोडीदार शोधण्याचा मार्ग सोयीस्कर करण्याच्या
या एकमेव उदात्त हेतूने सकल मराठा समाजाच्या मार्गदर्शनाखाली सगेसोयरे विवाह संस्थेच्या पुढाकारातून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी रविवारी (१ डिसेंबर) भव्य सकल मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. सगेसोयरे विवाह संस्थेचे कार्याध्यक्ष हरिभाऊ जगताप पाटील,
लक्ष्मणराव मडके यांचे सल्ला व मार्गदर्शनाखाली छावा संघटनेचे उपाध्यक्ष विजूभाऊ देवकर, गो-माता दुध संघाचे चेअरमन गणेश वाघमारे, चैतन्य ग्रुपचे संयोजक गुरुवर्य यशवंत दाते, गुरुदत्त ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय वाळुंज यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
समाज बांधवांनी आपल्या पाल्यांना यात सहभागी करून घेऊन लाभ घेण्याचे आवाहन रोहित गाडगे, शिवाजी देशमुख, श्रीकांत पाटील, सुमन राजेभोसले, प्रतिभा मरकड, सरिता गायकवाड, स्नेहलता पाटील यांनी केले आहे.