पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते पुणे ग्रामीण ३८ वी आंतरजिल्हा क्रिडा स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न

1 min read

पुणे दि.२८:- पुणे ग्रामीण पोलीस दलाचे ३८ व्या आंतरजिल्हा क्रिडा स्पर्धाचे समारोप कार्यक्रम पंकज देशमुख, (पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर क्रिडा स्पर्धा ही दि.२५.११.२०२४ ते दि.२७.११.२०२४ या कालावधीत पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी गणेश बिरादार, (अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, बारामती) व तानाजी बरडे (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय) यांचे समवेत पुणे ग्रामीण पोलीस दलातील उपाविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार हे उपस्थीत होते.

या स्पर्धेत विविध सांघिक व वैयक्तीक क्रिडा प्रकारात एकुण १३५ खेळाडुंनी उत्साहाने सहभाग दर्शविला. पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) यांचे हस्ते विजेत्या संघानां व खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले.

उपस्थित खेळाडुंचे मनोबल वाढविण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, बारामती) यांनी केले व

उपस्थितांचे तानाजी बरडे (पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय) यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप हा वादयवृंद पथकाच्या रिट्रीट झाल्यानंतर व सायोनारा या गिताने करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे