बोतार्डे येथे साप्ताहिक उद्याचा शिलेदार द्वितीय वर्धापन दिन ५ डिसेंबरला

1 min read

जुन्नर दि.२८:- जुन्नर तालुक्यातील मौजे बोतार्डे पो. खानगाव तालुका जुन्नर येथे साप्ताहिक उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाचा द्वितीय वर्धापन दिन येत्या ५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन मरभळ हे असून कार्यक्रमात प्रमुख अतिथी जुन्नर तालुक्यातील जेष्ठ साहित्यिक व लेखक डॉ. खंडू रघुनाथ माळवे उर्फ खरमा व जेष्ठ साहित्यिक व लेखक प्रा. नागेशजी हुलवळे हे लाभणार आहेत.साप्ताहिक उद्याचा शिलेदारचे द्वितीय वर्ष असून उद्याचा शिलेदारच्या वतीने २ डिसेंबर २०२४ रोजी जि. प. प्राथमिक शाळा बोतार्डे येथे प्रश्नमंजुषेचे आयोजन केले आहे तसेच ५ डिसेंबर २०२४ रोजी वर्धापन दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रशस्तीतिपत्रक, पुस्तक, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत व सामाजिक, राजकीय, कायदा, अर्थ, शैक्षणिक, कला व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तीना ट्रॉफी, पुस्तक, सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे.यामध्ये ऍड. सचिन चव्हाण वकील, ऍड. इंद्रभान गुंजाळ वकील, डॉ. खंडू माळवे, प्रा. नागेशजी हुलवळे जेष्ठ साहित्यिक लेखक, प्रशांत धोत्रे, सुरेश आप्पा गायकवाड पत्रकार, ओंकार रसाळ जनता सहकारी बँक जुन्नर मॅनेजर, किरण अवचर- पो. नि. जुन्नर पोलीस स्टेशन, लहू थाटे पो. नि.ओतूर पोलीस स्टेशन, पोपटराव वाघमारे माजी. ए. एस आय पुणे ग्रामीण, पोपट राक्षे मारुती वायाळ, अर्जुन जाधव, जनार्दन मरभळ सामाजिक कार्य या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन साप्ताहिक उद्याचा शिलेदार टीमने केले असून. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल शिंदे, सिद्धी तलांडे करणार असून आभार बाळू खरात करणार आहेत. आपण देखील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहावे असे प्रा. सतिश शिंदे यांनी आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे