शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

1 min read
ओतूर दि.३ :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये डुंबरवाडी (ता.जुन्नर) वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.सदानंद राऊत (विघ्नहर नर्सिंग होम, नारायणगाव) आणि सविता डुंबरे (शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ, नाशिक, ब्रँच मॅनेजर जुन्नर) तसेच संस्थेचे मानद सचिव वैभवशेठ तांबे, वसंत शिंदे (अध्यक्ष मराठी पत्रकार संघ, जुन्नर) सिमा सोनवणे सरपंच डिंगोरे, सचिन आमडेकर सरपंच उदापुर आणि जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉ रमेश काकड, स्व.विलासराव तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव राऊत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यु खरात, संगणक विभागप्रमुख डॉ सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभाग प्रमुख प्राध्यापक स्वप्निल डुंबरे, मेकॅनिकल विभागप्रमुख प्राध्यापक सचिन जाधव, स्नेहसंमेलनाच्या समन्वयक डॉ मोनिका रोकडे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

स्नेहसंमेलनाच्या क्रिडास्पर्धा दि.२७ मार्च ते २९ मार्च या कालावधीमध्ये महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन,कॅरम, चेस,मेहंदी, रांगोळी इत्यादीचा समावेश होता. तसेच महाविद्यालयामध्ये वेगवेगळे डे साजरे करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने साडी डे, शेरवानी डे, रोज डे,चॉकलेट डे, ट्रेडीशनल डे इत्यादींचा समावेश होता.
बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ सदानंद राऊत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यास व जिद्द ठेवून कसा पुढे जातो याविषयी विद्यार्थ्यांना स्वतःचा अनुभव सांगून मार्गदर्शन केले.
तसेच सविता डुंबरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनामध्ये अधिक गुण मिळविण्या सोबत इतर कलागुणांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी आपला विकास करावा असे आवाहन केले. डिंगोरच्या प्रथम नागरिक सीमा सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व त्यांनी डिंगोरे येथे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे विशेष कौतुक करून महाविद्यालयाने येणाऱ्या सत्रात पुनश्च: आमच्या येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्पस आयोजित करावा अशी मागणी केली.
तसेच संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे यांनी संस्थेच्या उभारणीत संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष स्वर्गीय विलासराव तांबे यांचे अथक परिश्रम व चिकाटी यांच्या समन्वयाने संस्थेच्या उभारणीत सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ओतूर येथून सुरू झालेली गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था इवल्याशा रोपट्यातुन वटवृक्षात कशी रूपांतरित झाली याची माहिती दिली. व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात यांनी महाविद्यालयातील विविध विषयांमधील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये मिळवलेल्या प्राविण्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल व प्राध्यापकांचे इंटरनॅशनल जर्नल्समध्ये सादर केलेले प्रबंधसाठी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाने विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाची व कामकाजाची माहिती दिली.निरनिराळ्या कंपन्यांसोबत केलेले एग्रीमेंट व ट्रेनिंग प्रोग्रॅम्स यांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात सायंकाळी सात ते दहा या वेळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले .
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे