मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नवीन वर्षा निमित्त प्रवेशोत्सव साजरा ;माझी शाळा- माझी ओळख उपक्रम

1 min read

बेल्हे दि.५:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या CBSE बोर्डाच्या शाळेचे २०२३-२४ हे नवीन शैक्षणिक वर्ष आज बुधवार (दि.५) पासून सुरु झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

शाळेचा उंबरठा पहिल्यांदाच ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी व आनंददायी वातावरणासाठी हार, तुरे, फुगे, फुलांच्या सजावटीद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जुन्नर तालुक्यात दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध असणारी शाळा अशी शाळेची ओळख असून शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पहिल्याच दिवशी माझी शाळा-माझी ओळख या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताचे ठसे त्यांच्या आवडीच्या रंगाने कागदावर उमटवले. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळेत सेल्फी पॉईंट उभा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा गेला. माळशेज निकेतनचे संस्थापक सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, शाळेत सीईओ शैलेश ढवळे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य विद्या गाडगे, विश्वस्त कणसे दावला यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे