कर्नाटकातील राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी दिलीप वळसे पाटील कॉलेजच्या ओमकार खणकरची निवड

1 min read

बेल्हे दि.२:- निमगाव सावा (ता. जुन्नर) राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने कर्नाटक स्टेट डेव्हलपमेंट अँड पंचायत राज विद्यापीठ गदग (कर्नाटक) येथे दिनांक 21 ते 27 मार्च दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी ओमकार विठ्ठल खणकर (प्रथम वर्ष वाणिज्य) याची निवड झाली आहे. या शिबिरात देशभरातील एकूण 210 विद्यार्थी व दहा कार्यक्रम अधिकारी सहभागी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करत असून पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधून फक्त दहा विद्यार्थ्यांची निवड या शिबिरासाठी करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांचे यासाठी अनमोल मार्गदर्शन लाभले. ओमकार याच्या निवडीबद्दल श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार, अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, रा.स.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय चव्हाण तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे